लातूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात होणारे हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचा विचार राज्य सरकारकडून सुरु आहे. याच मुद्द्यावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकावर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ते लातूरमध्य़े पत्रकार परिषदेत बोलत होते.
येत्या 7 तारखेला नागपुरात हिवाळी अधिवेशन होणार होतं. पण सरकार नागपूरला अधिवेशन घेणार नाही हे मी आधीच सांगितलं होतं. नागपुरात अधिवेशन घ्यायचं असेल तर त्यासाठी आधी मातोश्रीबाहेर पडावं लागेल. त्यामुळेच हे अधिवेशन मुंबईत घेतलं जात आहे, असं म्हणत चंदक्रांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
दरम्यान, यावेळचे हिवाळी अधिवेशन मुंबई घेण्याचा त्यांचा विचार आहे. त्यामुळे मुंबईत होणारे अधिवेशन कमीत कमी 15 दिवसांचे तरी असावे अशी आमची मागणी आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
आयपीएल 2020 फायनल! दिल्ली कॅपिटल्सने टाॅस जिंकला, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय
बिहार देवेंद्रजींनी आणले, महाराष्ट्रालाही फडणवीसच पाहिजे- नितेश राणे
तेजस्वी यादव यांची मेहनत तरुण राजकारणी मंडळींसाठी प्रेरणादायी- शरद पवार
“शिवसेनेनं महाराष्ट्रात भाजपला हिसका दाखवलाय, त्यामुळे बिहारमध्ये ते शब्द फिरवणार नाहीत”