आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
जळगाव : पुण्यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात जोरदार राडा झाला. स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात महागाईच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीने आंदोलन केलं. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या विभागीय अध्यक्षा वैशाली नागवडे यांना मारहाण केल्याची घटना घडली. यावरून आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यापुढे महाराष्ट्रात कुठल्याही पुरूषाने कुठल्याही पक्षातील महिलेवर हात उगारला तर हात तोडून हातात देईन, असा सज्जड इशारा सुप्रिया सुळेंनी यावेळी दिला. त्या जळगावमध्ये माध्यमांशी बोलत होत्या.
हे ही वाचा : “रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते, रामदास आठवलेंचे जुने सहकारी एम.डी.शेवाळे यांचं निधन”
दरम्यान, भाजप पक्षातील एक कार्यकर्ता महिलेवर होत उचलतो. त्या पक्षाला लाज वाटली पाहिजे. महिलेवर हात उचलणाऱ्या कार्यकर्त्याला भाजपनं पक्षातून काढायला हवं, असं कृत्य महाराष्ट्रात कधीही झालं नाही. भाजपनं महाराष्ट्रात हे कृत्य केलं आहे. भाजपकडून महिलांवर अन्याय होत राहिल्यास आम्ही त्यांनी त्यांचा भाषेच उत्तर देऊ, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
महत्वाच्या घडामोडी –
“….म्हणून राज ठाकरे पत्रकारांवर भडकले”
रोहित पवार तुम्ही अजून लहान आहात, तुम्ही महाराष्ट्राला सल्ले देऊ नकात- गोपीचंद पडळकर