आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : राज्यात झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत 6 जागांपैकी 4 जागांवर भाजपला विजय मिळाला असून यावरुन भाजप नेत्यांनी काँग्रेसवर टिकेची झोड उठवली आहे. अशातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय.
हे ही वाचा : औरंगाबादेत राज ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय; जिल्हाध्यक्षांना पदावरुन काढलं!
निवडणुका बिनविरोध करू असा शब्द काँग्रेसने न पाळल्यामुळे झालेल्या निवडणुकात भाजपला मोठं यश मिळालं आहे. आम्ही महाविकास आघाडीची मत फोडली, असं सांगतानाच तीन टर्म आमदार असलेल्या बाजोरियाना हरवून खंडेलवाल मोठ्या फरकाने विजयी झाले. बावनकुळेंच्या बाबतीत साई बाबांचं वाक्य खर श्रद्धा आणि सबुरीच फळ मिळालं आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. ते पुण्यात पत्रकारपरिषदेत बोलत होते.
दरम्यान, काँग्रेसने तर निवडणुकीचा पोरखेळ केला होता. आम्ही बिनविरोध करा म्हणत होतो. त्यांनी नागपूरमध्येही बाहेरून आणलेला माणूस त्यालाही फसवलं आहे. आता महाविकास आघाडीला माझं खुलं चॅलेंज आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने घेऊन दाखवा. कायद्यात बदल करून रडीचा डाव खेळू नका, असंही चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय.
महत्वाच्या घडामोडी –
“आजचा पराभव हा तर नाना पटोलेंचा पराभव, त्यांच्या मोगलाईमुळंच काँग्रेसचा पराभव झाला”
महाविकास आघाडी सरकार पडेल, असं वाटत नाही; राज ठाकरेंचं मोठं विधान
आगामी महापालिका निवडणुकीत भाजपच नंबर एकचा पक्ष असेल- देवेंद्र फडणवीस