‘तुम्ही चोऱ्या केल्या नसत्या तर धाडीही पडल्या नसत्या’; रावसाहेब दानवेंचा टोला

0
259

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नांदेड : काल सकाळपासून राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहिणीसह मुलगा पार्थ पवार यांच्यावर आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत. आयकर विभागाचे अधिकारी आद्यपही चौकशी करत आहे. यावरुन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पवारांवर निशाणा साधलाय.

‘आम्ही धाडी टाकयाला लावल्या असं काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते सांगत आहेत. तुम्ही चोऱ्या केल्या नसत्या तर धाडी टाकल्या असत्या का? असा सवाल रावसाहेब दानवे यांनी केला आहे. देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपा उमेदवार सुभाष साबणेयांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. त्यानंतर आयोजित जाहीर सभेत रावसाहेब दानवे बोलत होते.

दरम्यान, आता धाडी पडल्या आहे. यात कुणा कुणाची नावं आहे, याची कल्पना तुम्हाला आहे. धाडी पडल्यामुळे कसं थरथर घाबरायला लागले आहे. शरद पवार म्हणाले लखीमपूरमधील घटनेवर टीका केली म्हणून माझ्या अजित पवारांवर कारवाई करण्यात आली. जयंत पाटील म्हणाले आता होऊन जाऊ द्या एकदा, भाजप आणि राष्ट्रवादीसोबत, मग आम्ही ही म्हणतो एकटे एकटे या मग होऊन जाऊ द्या एकदाच, असंही रावसाहेब दानवे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

संघर्ष करणे पवार कुटुंबियांची खासियत, महाराष्ट्र कधीही दिल्लीपुढे झुकणार नाही; सुप्रिया सुळे कडाडल्या

मुख्यमंत्र्यांना पाहुणचार करू, पण… ; नारायण राणेंचा खोचक टोला

‘या’ निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची जोरदार तायारी; संभाव्य उमेदवारांची यादी तयार

‘…अन्यथा मानहानीचा दावा दाखल करणार’, संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांना इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here