उद्धवजी तुमचं आमचं जमत नसेल तर…; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सल्ला

0
472

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपकडून विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

आम्ही नवाब मलिकांचा राजीनामा मागतो आहोत. शरद पवार म्हणतात देणार नाही. उद्धव ठाकरे म्हणतात देणार नाही. उद्धवजी तुमचं आमचं जमत नसेल तर सोडून द्या, तुम्ही सरकार चालवताय. तुम्हाला सरकार लखलाभ असो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

हे ही वाचा : राज ठाकरेंनी मानले मनसैनिकांचे आभार, म्हणाले….

दरम्यान, एकदिवस तुम्हाला बाळासाहेबांना उत्तर द्यावं लागेल. मुंबईचे चिथडे चिथडे उडवणारा मंत्रिमंडळात होता तेव्हा तुम्ही काय केलं ?, असं बाळासाहेब विचारतील. आम्ही सांगू बाळासाहेब आम्ही संघर्ष केला. आपलेच सुपुत्र मुख्यमंत्री होते, सत्तेसाठी आंधळे झाले होते. ते त्यांचा राजीनामा घेऊ शकले नाहीत. राजीनामा मागितला तर सरकार जाईल, अशी भीती त्यांना वाटत होती, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“Breaking News! विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना पोलिसांनी घेतलं ताब्यात”

ते संजय राऊत किती बोलतात, कॅमेरा लागला की हे सूरू, आणि बंद झाल्यावर…; राज ठाकरेंचा खोचक टोला

‘…कारण मला द्यायचा आहे महाविकास आघाडीला झटका’; रामदास आठवलेंची खास शैलीत टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here