मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यातील जनतेशी संवाद साधताना राज्यातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्र्यांनी ऑक्सिजन, रेमडेसिवीर, कोरोना लस अशा प्रत्येक बाबतीत केंद्रावर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्व काही केंद्र सरकारवर ढकलणार असाल तर राज्यकर्ते म्हणून तुम्ही काय करणार? असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी यावेळी उपस्थित केला. चंद्रकांत पाटील यांनी एक प्रेस नोट काढली असून त्यात त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला.
दरम्यान, राज्यात कोरोनाची दुसरी लाट येणार ही अपेक्षा होती, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: कबूल केलं आहे. पण त्या लाटेचा सामना करण्यासाठी मधल्या 5 महिन्यात राज्य सरकारने काय तयारी केली हे सांगितलं नाही. रुग्णालयांना जोडून ऑक्सिजन निर्मितीसाठी प्रकल्प सुरू करण्यात येत आहेत व ते काही दिवसात सुरू होतील, असं उद्धव ठाकरे म्हणाले. पण हा तहान लागल्यावर विहीर खणण्याचा प्रकार आहे, असा टोला चंद्रकांत पाटलांनी यावेळी लगावला.
महत्वाच्या घडामोडी –
“प्रसिद्ध अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचं कोरोनामुळं निधन”
पंजाबचा बेंगलोरवर 34 धावांनी विजय
“…तर महाराष्ट्र लवकरात लवकर कोविडच्या संकटावर मात करून दाखवल्याशिवाय राहणार नाही”
वारंवार केंद्राकडे बोट दाखवून चालणार नाही,आपल्या सर्वांना एकत्र काम करावं लागेल- देवेंद्र फडणवीस