तुमच्यासारखे व्हिलन असतील तर त्यांचा सुपडा साप करायला वेळ लागणार नाही- रुपाली चाकणकर

0
523

जालना : माजी मंत्री आणि भाजपचे नेते बबनराव लोणीकर यांनी महिला तहसीलदार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वादाच्य भौऱ्यात सापडले आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी बबनरावांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

जिजाऊ- सावित्रीच्या लेकी हिरोईन आहेतच. याची काळजी तुम्ही करु नका. पण तुमच्यासारखे व्हिलन अजूबाजूला असतील तर त्यांचा सुपडा साप करायला आम्हाला वेळ लागणार नाही, असं म्हणत रुपाली चाकणकर यांनी बबनराव लोणीकर यांच्यावर निशाणा साधला.

सत्ता गेली पण सत्तेची मस्ती अजून गेलेली नाही. त्यामुळे बोलताना जरा भान ठेवा आणि काही वक्तव्य करताना जबाबदारीने करा, असं चाकणकर म्हणाल्या.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या मोर्चाला गर्दी जमवण्यासाठी आपण हिरोईन आणू. तहसीलदार मॅडम हिरोईनसारख्या दिसतात, असं खळबळजनक वक्तव्य बबनराव लोणीकरांनी केलं होतं.

महत्वाच्या घडामोडी-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हेगडेंचा तात्काळ राजीनामा घ्यावा- जयंत पाटील

“हिमंत असेल तर भाजपने अनंतरकुमार हेगडेंना पक्षातून बाहेर काढून दाखवावं”

“शेलार पुन्हा बाप काढाल तर याद राखा, आम्ही आधी शिवसैनिक आहोत मग मंत्री”

अरे तुझ्या बापाचं राज्य आहे का?; आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्याविरोधात एकेरी भाषा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here