मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टोपणनावाच्या मुद्द्यावरून पुन्हा भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी जयंत पाटील, शरद पवार तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
माझ्या नावाचा शॉर्टफॉर्म ‘चंपा’ असा होतो म्हणून ‘चंपा’ असं म्हणणं अयोग्य आहे. मग त्यानुसार जयंत पाटील यांचा ‘जपा’, शरद पवार यांचा ‘शपा’ किंवा उद्धव ठाकरे यांचा ‘उठा’ असा उल्लेख व्हायला लागला, तर हे सुसंस्कृत राजकारणात बसणारे ठरणार नाही., असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
आज पत्ते तुम्ही पिसताय, उद्या आम्ही डाव उलटवू- संजय राऊत
अहमद पटेल यांनीआयुष्यात अनेक वर्षे समाजसेवा केली; पंतप्रधान मोदींनी अर्पण केली श्रद्धांजली
काँग्रेसचे जेष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन
“भाजपने शिवसेनेशी युती केली, मात्र शिवसेनेने त्यांची जात दाखवली”