आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा उकरून काढल्यानंतर, राज्यातल्या राजकारणातील वातावरन तापलं आहे. अशातच या वादात आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी उडी मारली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असणाऱ्या मातोश्रीबाहेर आपण हनुमान चालिसा पठण करणार असल्याचं राणा दाम्पत्यांनी गुरुवारी जाहीर केलं होतं. त्यासाठी शुक्रवारी ते मुंबईत दाखल देखील झाले आणि आज सकाळी 9 वाजता कसल्याही परिस्थितीत आपण मातोश्री बाहेर जाऊन हनुमान चालिसा पठण करणार असल्याचं राणा दाम्पत्यांनी म्हटलं आहे. यानंतर आता राणा दाम्पत्याच्या घराबाहेर शिवसैनिकांनी जोरदार फिल्डिंग लावली.
हे ही वाचा : “गरज पडली तर दिल्लीत कोणालाही टक्कर देईल, ही महाराष्ट्रात धमक आहे, असा छत्रपतींचा इतिहास आहे”
नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या मुंबईतील खारच्या घराबाहेर शिवसैनिकांनी रात्रभर खडा पहारा दिला. राणा दाम्पत्याला घराबाहेर पडू न देण्याची व्यूहरचना शिवसैनिकांनी आखली. त्यामुळे काल संध्याकाळपासूनच शिवसैनिक तिथं जमले आणि त्यांनी भजन-कीर्तन सुरू केलं. इमारतीबाहेर बॅरिकेटिंग करण्यात आलं. त्याच्या बाहेरच्या बाजूला शिवसैनिक जमलेत.
हिंमत असेल तर राणा दाम्पत्यानं बाहेर पडून दाखवावंच, असं खुलं आव्हान शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याला दिले आहे. तसेच भाजपच्या सांगण्यावरुन राणा दाम्पत्य स्टंट करत असल्याचा आरोप यावेळी शिवसेनेने केला.
महत्वाच्या घडामोडी –
निवडणूकीच्या वेळी तुमचा बाप वेगळा होता, आता तो बदलला; बच्चू कडूंचा राणा दाम्पत्यावर हल्लाबोल
मातोश्रीकडे येण्याची कोणी हिंमत करणार नाही, तुम्ही आता घरी जा; उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना सूचना
उद्या वाजता हनुमान चालिसा वाचण्यासाठी मातोश्रीवर जाणारच; राणा दाम्पत्याचा निर्धार