Home महाराष्ट्र ‘अडचणी आमच्या नाही तर, ठाकरे सरकारच्या वाढतील’; लूक आऊट सर्क्युलर नोटिसीवरुन नितेश...

‘अडचणी आमच्या नाही तर, ठाकरे सरकारच्या वाढतील’; लूक आऊट सर्क्युलर नोटिसीवरुन नितेश राणेंचा इशारा

मुंबई : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आमदार नितेश राणे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे यांच्याविरोधात लुकआउट सर्क्युलर नोटीस बजावली आहे. यावर आमदार नितेश राणे  यांनी प्रतिक्रिया देताना ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.

नितेश राणे म्हणाले, हे सर्क्यूलर पुणे पोलिसांनी काढलं आहे. पण आमचे डीएचएफएलचे खाचे मुंबई ब्रांचमध्ये आहे. त्यामुळे पुणे क्राईम ब्रांचला हा अधिकार मिळाला कसा? तसेच आम्ही ५ महिन्यापुर्वी लोन सेटलमेंट कारण्याबद्दलचे पत्र सबंधित बँकेला दिले आहे. त्यामुले अशा नोटिसीमुळे आम्हाला काहीही फरक पडणार नाही, असं नितेश राणेंनी म्हटलं आहे.

आम्ही सतत भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढत आहोत आणि ठाकरे सरकारची झोप उडवत आहोत, म्हणूनच असले प्रकार होताना दिसत आहे. आता यांचे सगळे भ्रष्टाचाराचे विषय बाहेर निघणार आहेत. त्यामुळे अडचणी आमच्या वाढणार की ठाकरे सरकारच्या वाढणार हे तुम्हाला येणाऱ्या दिवसात दिसून येईल.तसेच सर्क्यूलर त्यांनी आम्हाला नाही तर विमानतळ प्राधिकरणाला पाठवली आहे. त्यामुळे आम्हाला प्रवास करता येणार की नाही हे त्यांना ठरवावं लागणार आहे. आम्ही महाराष्ट्र सोडून जाणार नाही, असंही नितेश राणे म्हणाले आहेत.

दरम्यान, नीलम राणे आर्टलाइन प्रॉपर्टीज या कंपनीने डीएचएफएलकडून घेतलेले कर्ज न फेडल्याप्रकरणी कोर्टाच्या आदेशानुसार हे लुकआउट सर्क्युलर काढण्यात आले आहे.

महत्वाच्या घडामोडी –

पवारांनी काँग्रेसचे चपखल वर्णन केलंं, आमच्या वऱ्हाडात असं म्हणतात की…; फडणवीसांचा टोमणा

‘…तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं स्वागत करू’; नारायण राणेंची ‘त्या’ वक्तव्यावरून पलटी

“काँग्रेस पक्ष सध्या संकटात असला तरी, केंद्रात पुन्हा सोनियाचेच दिवस येणार आहेत”

“धक्कादायक! 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर भाजप नेत्यासह 3 जणांचा सामुहिक बलात्कार”