मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे. मनसेच्या राजेश कदम यांनी शिवसेनेत, तर मंदार हळबे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
काहींनी पक्ष सोडल्यानं पक्षाला काही फरक पडत नाही., असं बाळा नांदगावकर म्हणाले. तसेच जुने गेले तर नवे कार्यकर्ते उभारी घेतील. सगळ्यांनाच राज ठाकरे होता येत नाही, असं म्हणत बाळा नांदगावकर यांनी पक्ष सोडणाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“मनसेला धक्का! मनसेच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश”
“ठाकरे ‘संपत्ती’ लपवण्यात, तर धनंजय मुंडे ‘संतती’ लपविण्यात व्यस्त”
“रायगडावरील तिकीटघराचा शिवभक्तांकडून कडेलोट”
मागील 100 वर्षांमध्ये कधी पाहण्यात आला नाही असा अर्थसंकल्प मांडला; अमृता फडणवीस झाल्या ट्रोल