Home महाराष्ट्र ठाकरे सरकारने 3 दिवसात वीज बिलात सवलतीचा निर्णय न घेतल्यास मंत्रालयात घुसून...

ठाकरे सरकारने 3 दिवसात वीज बिलात सवलतीचा निर्णय न घेतल्यास मंत्रालयात घुसून आंदोलन करू- अतुल भातखळकर

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने 3 दिवसांत वीज बिलात सवलतीचा निर्णय न घेतल्यास मंत्रालयात घुसून आंदोलन करू, असं म्हणत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी सरकारला इशारा दिला आहे. भाजपने आज मुंबई येथील महावितरणच्या प्रकाशगड कार्यालयावर मोर्चा काढला. यात भातखळकर बोलत होते.

महाविकास आघाडी सरकारने येत्या 3 दिवसांत वीज बिलांच्या सवलतीचा निर्णय घ्यावा. याबाबत निर्णय न घेतल्यास मंत्रालयात घुसून आंदोलन करू, असं म्हणत अतुल भातखळकर यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, कोरोनाच्या काळात भरमसाठ वीज बिल अदा करणाऱ्या ठाकरे सरकारला आगामी काळात महाराष्ट्रातील जनता शॉक दिल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणत अतुल भातखळकरांनी सरकारवर टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

एव्हरग्रीन ब्युटी अभिनेत्री ऐश्वर्या नारकरांच्या मनमोहक अदा; सोशल मिडीयावर फोटो व्हायरल

…तर ठाकरे सरकार काय गोट्या खेळायला बसलंय काय?; निलेश राणेंचा हल्लाबोल

“31 डिसेंबरपर्यंत मुंबईतील सर्व शाळा बंदच राहणार”

“ठाकरे सरकार हे सैतानी सरकार; मदत हवी असल्यास पवारांच्या घरी उपोषणाला बसावे लागेल”