Home महाराष्ट्र आमच्या आईचं दूध कुणी बाजारात नेवून विकत असेल, तर…; कोल्हापूरात खासदार धैर्यशील...

आमच्या आईचं दूध कुणी बाजारात नेवून विकत असेल, तर…; कोल्हापूरात खासदार धैर्यशील मानेंविराधोत शिवसैनिक आक्रमक

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे शिवसेनेत गळती सूरू झाली आहे. 40 आमदारांनंतर आता शिवसेनेच्या 12 खासदार शिंदे गटात सामील झाले. यात कोल्हापूरातील हातकणंगलचे खासदार धैर्यशील माने यांचाही समावेश आहे. यावरून आता शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. यावरून आता शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी बंडखोर खासदार धैर्यशील माने यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

उद्धव ठाकरे यांनी धैर्यशील माने आणि आदित्य ठाकरे यांच्यात कधीही फरक केला नाही. पोटच्या मुलाप्रमाणे त्यांचा मान-सन्मान केला. तसेच धैर्यशील माने वाटेल तेंव्हा वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांना भेटायला जात होते. त्यांना लागेल तसा निधी उद्धव ठाकरेंकडून दिला जात होता. तरीसुद्धा माने यांनी गद्दारी केली. त्यामुळे येत्या 25 तारखेला मी तमाम शिवसैनिक आणि मतदारांना घेऊन धैर्यशील माने यांच्या घरावर मोर्चा काढणार आहे. तसेच त्यांनी गद्दारी आणि बंडखोरी का केली? याबाबत त्यांना जाब विचारल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा इशारा जाधव यांनी यावेळी दिला. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

हे ही वाचा : आज अजित पवारांचा वाढदिवस, अन् रोहित पवारांनी अशा दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले…

दरम्यान, आम्ही वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत. त्यामुळे आमच्यासमोर तुम्ही केंद्रीय दल आणा किंवा इतर कोणतंही दल आणा, हा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. तो कुणाला घाबरत नाही. आम्ही काही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही आणि शिवसेना आमची आई आहे. आमच्या आईचं दूध कुणी बाजारात नेवून विकत असेल, तर आम्ही ते उघड्याडोळ्यांनी पाहू शकत नाही. जशास तसे उत्तर देणार. एक-एक शिवसैनिक समोरच्या 100 जणांना भारी असतो, निश्चितपणे आम्ही मोर्च्याच्या माध्यमांतून उत्तर देणार आहोत. गद्दाराला शिवसेनेत अजिबात क्षमा नाही, त्यामुळे 25 तारखेचा मोर्चा अलौकिक असणार आहे, असंही जाधव म्हणाले.

महत्त्वाच्या  घडामोडी –

आज अजित पवारांचा वाढदिवस, अन् रोहित पवारांनी अशा दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले…

“आता काँग्रेसच्या 20 माजी नगरसेवकांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट; राजकीय चर्चांना उधाण”

“ठाकरे कुटुंब आणि शिवसेना हेच आपले पंढरपूर आणि पांडुरंग”