समीर वानखेडेंच्या केसालाही धक्का लागला तर…, किरीट सोमय्यांचा नवाब मलिकांना इशारा

0
393

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : समीर वानखेडेला वर्षभरात तुरुंगात टाकणार, असं खुलं आव्हान देतो. वर्षभरात तुझी नोकरी जाईल, तुझा तुरुंगवास निश्चित आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केलं होतं. त्यावरुन आता भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी नवाब मलिक यांच्यावर टीका केली आहे.

कर्तव्य बजावणाऱ्या आधिकाऱ्यांवर चुकीचे आरोप करून त्यांचे खच्चीकरण करण्याचा उद्योग ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक करीत आहेत. मंत्री असलेले मलिक ड्रग्स माफियांचे प्रवक्ते आहेत का? असा सवाल करत समीर वानखेडे यांच्या केसालाही धक्का लागला तर नवाब मलिक तुमची खैर नाही, असा इशारा किरीट सोमय्या यांनी आज दिला.

हे ही वाचा : जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्या; संघाचा भाजपाला सल्ला

‘‘मलिक हे राज्याचे मंत्री आहेत की नाही असा प्रश्‍न पडावा अशा पद्धतीने ते बोलत आहेत. मंत्री असूनही ते ड्रग्स माफियांचे प्रवक्ते असल्यासारखे वारंवार बोलत आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर ठाकरे सरकारमधील कुणीही बोलायला तयार नाही. मलिक यांच्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील यावर बोलत नाहीत याचा अर्थ पवार व ठाकरे यांचीच भाषा मलिक बोलत आहेत, असे समजावे का’’, असंही किरीट सोमय्या म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी – 

“देगलूरच्या विजयानंतर देवेंद्र फडणवीसांकडून ठाकरे सरकारचा करेक्ट कार्यक्रम”

“सरकारमध्ये थोडी जर चाड शिल्लक असेल, तर नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा”

“कोणाच्याही नादाला न लागता पंजाला मतदान करा, शेवटी तुमची कामे मीच करणार”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here