Home महाराष्ट्र ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर रस्त्यावर उतरू; देवेंद्र फडणवीसांचा सरकारला इशारा

ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर रस्त्यावर उतरू; देवेंद्र फडणवीसांचा सरकारला इशारा

मुंबई : आज भाजपच्या ओबीसी कार्यकारिणीची बैठक पार पडली. या कार्यकारिणीला संबोधित करताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

मराठा समाजाला आरक्षण देताना आम्ही त्यात ओबीसींच्या आरक्षणाला धक्का दिला जाणार नाही, याबाबतचं कलम टाकलं. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. पण या कलमाला कोणतीही स्थगिती दिली नाही., असं फडणवीस म्हणाले.

या कलमाद्वारे आम्ही ओबीसी आरक्षणाला संरक्षण दिलं आहे, असं म्हणत कोणत्याही परिस्थितीत आम्ही ओबीसी आरक्षणात वाटेकरी स्वीकारणार नाही. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावाल तर याद राखा, रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा यावेळी देवेंद्र फडणवीसांनी सरकारला दिला.

दरम्यान, ओबीसी आरक्षणाबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांची अधिकृत भूमिका स्पष्ट करावी, असंही फडणवीसांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी-

नाशिकचा पुढचा महापौर शिवसेनेचा असेल- संजय राऊत

औरंगाबादचा विकास वेगाने होणार, मला विकास कामे करण्याची घाई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

“रावसाहेब दानवेंची जीभ कापणाऱ्याला 10 लाखांचं रोख बक्षीस”

“कुणीही कोणासोबत गेलं तरी मुंबई महापालिका शिवसेनेकडेच राहणार”