मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेतली. या भेटीनंतर मनसे-भाजप युती होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे. यावर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया दिली.
भविष्यात मनसे आणि भाजप एकत्र येणार असेल तर आनंदच होईल, असं सूचक वक्तव्य बाळा नांदगावकर यांनी केलं. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राज ठाकरे, अमित ठाकरे हे नाशिक, पुणे आणि ठाण्याच्या दौऱ्यावर होते. मुंबईतही आमची मोर्चेबांधणी सुरू आहे. आम्ही आमच्या पद्धतीने आमचं काम करत आहोत. व्यक्तिगत पातळीवर सर्वच पक्षाची कामं सुरू आहेत. पण दोन पक्ष भविष्यात एकत्र येण्याचा प्रयत्न असेल तर त्याचा आनंदच असेल, असं बाळा नांदगावकर यांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
राज ठाकरे – चंद्रकांत पाटील भेट; राजकीय वर्तुळात तर्क वितर्कांना उधाण
“सरकार चालवताय की दाऊदची गँग?”; आशिष शेलारांचा सवाल
युतीबद्दल पंतप्रधान मोदी-अमित शहा यांच्याशी चर्चा करून सांगते- अमृता फडणवीस
“डॉ.अमोल कोल्हे यांनी घेतली संजय राऊत यांची भेट; चर्चांना उधाण”