धुळे : महाविकास आघाडीतील आमदारांनी राजीनामे दिले, तर शासनाला आरक्षण देणे भाग पडेल, असं वक्तव्य भाजप नेते नितेश राणे यांनी केलं.
महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाज आरक्षणापासून वंचित आहे. आरक्षणाच्या भीतीपोटी राज्य शासनाने लॉकडाऊन 16 जूनपर्यंत वाढवला, असं नितेश राणे यांनी म्हटलं. नितेश राणे यांच्या उपस्थितीत आज मराठा समाज बांधवांची बैठक झाली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात ते बोलत होते.
दरम्यान, राज्य शासनाने देऊ केलेले ईडब्ल्यूएस प्रवर्गातील आरक्षण केंद्र शासनाचा निर्णय असल्याचं नितेश राणेंनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
“बारामतीत अजित पवारांच्या जवळच्या कार्यकर्त्यावर जीवघेणा गोळीबार हल्ला”
…तर पुढची 100 वर्षे भाजप सत्तेत येणार नाही- संजय राऊत
संभाजीराजेंवर पाळत ठेवण्याचा प्रश्नच नाही, त्यांचा गैरसमज दुर केला; गृहमंत्र्यांचं स्पष्टीकरण
ओबीसी आरक्षणाबाबत भाजपची भूमिका म्हणजे मगरीचे अश्रू- नाना पटोले