आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या कथित पत्नी करुणा मुंडे यांना 5 सप्टेंबरला अटक झाली होती. जवळपास 16 दिवसांनी त्यांची न्यायालयीन कोठडीतून जामिनावर सुटका झाली आहे. सुटका झाल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा फेसबुकवर लाइव्ह करत विविध मुद्यांवर भाष्य केले आहे.
धनंजय मुंडे यांनी हायकोर्टात लेखी दिले आहे की मी त्यांची 1998 पासून पत्नी असून आम्हाला दोन मुलं देखील आहेत. त्यामुळे माझ्या नावाचा उल्लेख करुणा शर्मा असा न करता करुणा धनंजय मुंडे असा करावा अशी विनंती करत आहे. पतीचे नाव किंवा आडनाव हा स्त्रीसाठी एक स्वाभिमानाची आणि अभिमानाची गोष्ट असते. मी जर रखेल किंवा बाजारू बाई असते तर मी ही लढाई लढले नसते. यामुळेच मी लाइव्ह आले असून गेल्या 8-9 महिन्यांपासून माझी ही लढाई सुरु आहे, असं करुणा शर्मा म्हणाल्या आहेत.
माझ्यावर माझ्या पतीने कोर्टाद्वारे काही निर्बंध आणले असल्याने मी माध्यमांमध्ये बोलू शकत नाही. ते केस करून गप्प बसले आहेत. ना ते ही केस पुढे नेत आहेत ना ते मागे घेत आहेत. माझ्याकडे प्रत्येक गोष्टीचे पुरावे आहेत. माझ्या पतीनेच न्यायालयात हे मान्य केले आहे की मी त्यांची पत्नी आहे. आणि त्यांच्यापासून मला दोन मुलं आहेत, असंही करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“…हा बाळासाहेबांचा आम्हाला आशीर्वाद असल्यासारखा आहे”
शिवसेनेचा काँग्रेसला मोठा धक्का; काँग्रेसचा ‘हा’ बडा नेता शिवबंधनात अडकला
ड्रग्सप्रकरणी नवाब मलिकांचा भाजपावर आरोप; आता मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
वसुली आली की या सरकारचा `ससा` होतो आणि शेतकर्यांच्या मदतीवेळी ‘कासव’; फडणवीसांची टीका