आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्यात शिंदे गट आणि भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवरुन विरोधकांनी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. या टीकेली देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय.
हे ही वाचा : राज ठाकरेंनी शिवसेना ‘सोडली’, पण…; राष्ट्रवादी नेत्याची टीका
या महाराष्ट्राची एक राजकीय संस्कृती आहे. त्या राजकीय संस्कृतीमध्ये एकमेकांशी संबंध ठेवणं हे कुठेही गैर नाही. राज ठाकरेंचं ऑपरेशन झालं त्यानंतर अनेक नेते त्यांना भेटायला गेले, असं देवेंद्र फडणीवस म्हणाले आहेत.
मी तर स्वतः सभागृहात देखील त्यांना भेटायला जाणार असल्याचं उल्लेख करून सांगितलं होतं. मग मी त्यांना भेटायला गेलो तर कोणाला मळमळायचं कारण काय आहे?, असंही देवेंद्र फडणीवस यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
महापालिका निवडणूकीत महाविकास आघाडी होणार?; शरद पवारांचं सूचक विधान, म्हणाले…
मीरा-भाईंदरमधील ‘ते’ 11 नगरसेवक आजही उद्धव ठाकरेंसोबत; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा दावा
उपमुख्यमंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर; चर्चांना उधाण