मुंबई : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात रेणु शर्मा या तरुणीने पोलिसात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. मात्र धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत हे सर्व खोटं असल्याचं म्हटलंय. त्यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्याचे जबाबदार कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेला बलातकाराचा आरोप हे गंभीर आणि धक्कादायक आहे. राजकीय दबावाला बळी न पडता या आरोपाची पोलिसांनी चौकशी करावी, असं चित्रा वाघ यांनी म्हणाल्या आहेत.
मुलीनं केलेल्या आरोपामध्ये काही जर तथ्य असेल आणि धनंजय मुंडे दोषी आढळले तर नियमाप्रमाणं शिक्षा व्हावी, असं म्हणत नैतिकता म्हणून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.
लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या @dhananjay_munde यांनी नैतिक जबाबदारीने तात्काळ राजीनामा द्यावा आणि पोलिसांनी कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता कसून या प्रकरणाची चौकशी करावी ! @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil @MumbaiPolice @ANI pic.twitter.com/b4B93JKA4o
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 13, 2021
महत्वाच्या घडामोडी-
धनंजय मुंडेंची आमदारकी धोक्यात?; ‘या’ भाजप नेत्याने केली निवडणूक आयोगाकडे तक्रार
“संमतीने ठेवलेले संबंध हा बलात्कार नसतो; 2006 पासून 2020 पर्यंत का शांत बसला?”
“मुस्लिम नागरिक 4 विवाह करतात, धनंजय मुंडेंनी 2 केलं तर काय बिघडलं?”
धनंजय मुंडे यांनी तातडीने राजीनामा द्यावा- चंद्रकांत पाटील