Home महाराष्ट्र “संमतीने ठेवलेले संबंध हा बलात्कार नसतो; 2006 पासून 2020 पर्यंत का शांत...

“संमतीने ठेवलेले संबंध हा बलात्कार नसतो; 2006 पासून 2020 पर्यंत का शांत बसला?”

मुंबई : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात रेणु शर्मा या तरुणीने पोलिसात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. मात्र धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत हे सर्व खोटं असल्याचं म्हटलं आहे. यावर मनसे नेत्या रूपाली पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बलात्कार झालेल्या महिलेला न्याय मिळालाच पाहिजे. राजकारणांनो बलात्कार हे तुमच्या राजकारण खेळी बनवून नका. आणि बायांनो तुमच्या संमतीचे शाररिक संबंध हे राजकारणात कोणाला वापरून देऊ नका., असं रूपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या.

तुमच्या मुळे आमच्या खरोखर पीडित बलात्कार झालेल्या अन्याय झालेल्या भगिनींला न्याय मिळत नाही. याची एक महिला म्हणून लाज बाळगा. ज्या वेळी अत्याचार झाला त्याच वेळी गुन्हा दाखल करायचा होता. 2006 पासून 2020 पर्यंत का शांत बसला? बलात्कार हा त्या महिलच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने होत असतो. संमतीने ठेवलेले संबंध बलात्कार हा बलात्कार नसतो. जय महाराष्ट्र,जय मनसे, असं रूपाली पाटील यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

*चुकीच्या गोष्टींना न घाबरता*
*विरोध करायला शिका*

छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य आहे.

*वास्तव्य मांडणे आपला हक्क…

Posted by Rupali Patil Thombare on Wednesday, January 13, 2021

महत्वाच्या घडामोडी-

“मुस्लिम नागरिक 4 विवाह करतात, धनंजय मुंडेंनी 2 केलं तर काय बिघडलं?”

धनंजय मुंडे यांनी तातडीने राजीनामा द्यावा- चंद्रकांत पाटील

“हिंदू धर्मात 2 पत्नी अमान्य असतील तर भाजपचे नेतेही टेन्शनमध्ये येतील”

“…पण मी मरेपर्यंत लढत राहणार”