आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : माजी पंतप्रधान डाॅ. मनमोहन सिंग यांच्या ऐवजी काँग्रेसने जर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पंतप्रधान केलं असतं तर देशाचं आणि महाराष्ट्राचं राजकारण कसं असतं? यावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
मनमोहन सिंग यांच्याऐवजी जर शरद पवारांना पंतप्रधान केलं असतं तर काँग्रेसची आज जी दुर्दशा झाली आहे, तेवढी दुर्दशा झाली नसती, असं रामदास आठवले म्हणाले. ते काल इंदोरमध्ये माध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, 2004 लोकसभा निवडणुकीत यूपीएला बहुमत मिळालं होतं. त्यावेळी मी दोन पर्याय सूचवले होते. एक म्हणजे सोनिया गांधींना पंतप्रधान करावं नाही तर मनमोहन सिंग यांच्या ऐवजी शरद पवार यांना पंतप्रधान करावं. पवार हे जनाधार असलेले लोकप्रिय नेते आहेत. ते पंतप्रधानपदासाठी योग्य होते. पवारांना पंतप्रधान करावं म्हणून आपण सोनया गांधींकडे आग्रह ही धरला होता. पण त्याकडे लक्ष दिलं गेलं नाही, असा मोठा गौप्यस्फोट आठवेलेंनी यावेळी केला.
महत्वाच्या घडामोडी –
राज साहेब, भाजपशी युती करा, निवडणुकीत फायदा होईल; पुण्यातील मनसे नेत्यांची मागणी
शिवसेनेची बारामतीवर नजर! संजय राऊत म्हणतात…
रावसाहेब दानवेंमुळेच औरंगाबाद-जळगाव महामार्गाचं काम रखडलं- चंद्रकांत खैरे
“हर्षल पटेलची जबरदस्त हॅट्रिक! आरसीबीचा मुंबई इंडियन्सवर 54 धावांनी दणदणीत विजय”