“भाजप हा हवेत चालणारा पक्ष असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस हा झोपेत चालणारा पक्ष आहे”

0
162

पुणे : भाजप हा हवेत चालणारा पक्ष असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस हा झोपेत चालणारा पक्ष आहे. त्यांना झोपेत चालण्याची सवय आहे, असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ते राजगुरुनगर येथील पदवीधर मेळाव्यानंतर माध्यमांशी बोलत होते.

राष्ट्रवादीला फुकटची सत्ता मिळाली आहे, नाही ते आरोप करुन डोक्यात जाऊ नका. तुम्ही जर नम्रपणे वागलात तर सर्व गोष्टी मार्गी लागतील. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या संस्कृतीमध्ये मुंगी होऊन साखर खायची असते, भाजपविषयी उघडपणे बोललेलं यापुढे सहन करणार नाही, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा दिला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“महाराष्ट्राच्या हास्यजत्रेसाठी अभिनेत्री पूजा सावंतचा नवीन खास लूक”

“भाजपच्या ‘या’ आमदाराला कोरोनाची लागण”

“शरद पवारांच्या शब्दाला राज्य सरकारमध्ये किंमत उरली नाही”

“राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here