नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटात राजस्थानमध्ये सरकार अस्थिरतेचे संकट उभे राहिले आहेत. सचिन पायलट यांच्यावर पक्षविरोधी कारवाई केल्याचा आरोप करत काँग्रेसकडून पायलटांची उपमुख्यमंत्रीपद आणि प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. काँग्रेसच्या या निर्णयानंतर राजस्थानचे राजकारण चांगलेच रंगले आहे. तसेच भाजपकडून राज्य सरकार अस्थिर केले जात असून आमदार फोडण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा दावा मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे.
भाजपाने जर आमदार खरेदी करण्याऐवजी व्हेंटिलेटर्स खरेदी करण्याकडे लक्ष दिले असते, तर कोरोनातून हजारो भारतीयांचे प्राण वाचवता आले असते, असं म्हणत काॅंग्रेसने भाजपवर टीका केली आहे.
दरम्यान, अशा प्रकारे ट्वविट करत काॅंग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे.
भाजपा अगर “विधायक” खरीदने के बजाय “वेंटिलेटर” खरीदने पर ध्यान देती तो कोरोना से हजारों भारतीयों की जानें बचाई जा सकती थी।
— Congress (@INCIndia) July 15, 2020
महत्वाच्या घडामोडी-
अनुसूचित जाती आणि जमातीचे राजकीय आरक्षण रद्द करा- प्रकाश आंबेडकर
पालघरची घटना केवळ अफवा पसरल्यामुळे घडली- अनिल देशमुख
मुंबईतील फोर्ट परिसरात इमारत कोसळून दुर्घटना
महाजॉब्स जाहिरात वादावर बाळासाहेब थोरातांची रोखठोक भूमिका