नागपूर : बाळासाहेब हयात असते तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेच नसते, असं म्हणत माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री होण्यासाठीच उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हात मिळवणी केली, असा आरोपही नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाताना स्वत:च्या पक्षाचीही विचारधारा त्यांना संभाळता आली नाही, असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे.
दरम्यान, आज ठाकरे सरकारच्या हिवळी आधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. आधिवेशन सुरु झाल्यापासून रोज नवीन घडामोडी घडत आहेत. सभागृहात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये चांगलीच कलगीतूरा पाहायला मिळत आहे. याच पार्शवभूमीवर नारायण राणे यांनी नागपूरात पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
महत्वाच्या घडामोडी-
-नागरिकत्व कायद्याला जे लोक विरोध करत आहेत ते देशद्रोही- संभाजी भिडे
-अजित पवार हे आमचे होणारे उपमुख्यमंत्री; संजय राऊत यांचं सुचक वक्तव्य!
-डॉ. श्रीराम लागू यांच्या पार्थिवावर आज पुण्यात अंत्यसंस्कार
-आमच्या सरकारने भारतीय अर्थव्यवस्थेला वाईट परिस्थितीतून बाहेर काढलं- नरेंद्र मोदी