आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : माझ्यावर दबाव आहे. कारण सर्वच आता न्यायाधीश झाले आहेत, असं विधान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली.
मुख्यमंत्र्यांवर कुणाचा दबाव असेल तर त्याविरोधात भाजप आंदोलन करेल, असा टोला आशिष शेलार यांनी यावेळी लगावला. आशिष शेलार हे आज राज्यपालांच्या भेटीसाठी गेले होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
हे ही वाचा : नोकरीबाबत सल्ला घेण्यासाठी वडिलांनी शरद पवारांकडे नेलं- दिलीप वळसे पाटील
मुख्यमंत्र्यांनी बाकीचे दबाव सोडावेत. त्यांनी मुळातच न्यायाधीशांनी दिलेल्या आदेशावर तरी काम करावे. मुख्यमंत्र्यांचा इशारा आजूबाजूला बसलेल्या दोन पक्षांकडे असेल तर त्याविरोधात आम्ही लढाही देऊ. पण आमचा सवाल न्यायाधीशांनी दिलेले आदेश तरी पाळणार आहात का? हा आहे, असंही शेलार म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
नाशिक महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकणार- संजय राऊत
“सत्तेचा गांजा नसानसात भिनल्याने, समीर वानखेडेंच्या बायकोवर अभद्र भाषेत टिका सुरू आहे”
“भाजपला मोठा धक्का, लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्व उमेदवारांचे अर्ज बाद”