आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून बॉलिवूड सातत्यानं वादात येत आहे. अनेक वादग्रस्त सिनेमांचा बॉलिवूडला चांगलाच फटका बसला आहे. यावरून आता मनसेनं बाॅलिवूडला इशारा दिला आहे.
मनसे नेते अमेय खोपकर यांनी ट्विट करत बाॅलिवूडवर जोरदार निशाणा साधला आहे. मनसे आधापासूनच बॉलिवूडमध्ये असलेल्या पाकिस्तानी कलाकारांच्या विरोधात आहे. याआधाही मनसेनं अनेक वेळा बॉलिवूडमधील पाकिस्तानी कलाकारांना हाकलून देण्यासाठी भूमिका घेतली होती. यावेळी पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूड किंवा इतर भाषेतील सिनेमात काम दिल्यास गंभीर परिणाम भागावे लागतील, असा इशारा अमेय खोपकरांनी यावेळी दिला.
हे ही वाचा : बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती बरखास्त होणार?; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…
बॉलिवूडमधील काही निर्मात्यांना पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकारांचा पुळका आलाय, असं कानावर येतंय. ही नीच प्रवृत्ती वेळोवेळी ठेचावीच लागेल, म्हणूनच पुन्हा एकदा आम्ही स्पष्ट शब्दांत इशारा देतोय की फक्त मुंबईच काय, हिंदुस्थानातील कोणत्याही भाषेतल्या कलाकृतीत पाकिस्तानी कलाकार दिसला तर त्याचे गंभीर परिणाम संबंधित निर्मत्यांना भोगावे लागतील., असा इशारा अमेय खोपकर यांनी ट्विटमधून दिला आहे.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) November 16, 2022
महत्त्वाच्या घडामोडी –
“राज्यात आता महाविकास आघाडीचं मोठं शक्तीप्रदर्शन; गांधी-ठाकरे-पवार एकत्र येणार?”
जितेंद्र आव्हाडांच्या विनयभंग प्रकरणावर आता मनसेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
आगामी विधानसभा निवडणूकीआधी राष्ट्रवादीला मोठा धक्का; ‘या’ आमदाराने पक्षाला ठोकला रामराम