Home महाराष्ट्र मी मनसेतच राहणार, आता सगळ्या ऑफर्स संपल्या; राज ठाकरे यांच्या भेटीनंतर वसंत...

मी मनसेतच राहणार, आता सगळ्या ऑफर्स संपल्या; राज ठाकरे यांच्या भेटीनंतर वसंत मोरे यांचं विधान

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मनसेचे डॅशिंग नगरसेवक वसंत मोरे यांना मनसे पुणे शहर प्रमुख पदावरुन हटवण्यात आलं असून मनसे नगरसेवक साईनाथ बाबर यांच्याकडे आता पुणे शहर प्रमुखपदाची धुरा देण्यात आली आहे. त्यानंतर मोरे यांना अनेक पक्षांकडून ऑफर येत असतानाच आज वसंत मोरे यांनी आज शिवतीर्थवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.

तब्बल अर्धा तास चर्चा केल्यानंतर वसंत मोरे स्मितहास्य देत शिवतीर्थवरून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत आजच्या भेटीत काय चर्चा झाली याबाबतची माहिती दिली.

हे ही वाचा : मोठी बातमी! कोल्हापूरात भाजपच्या माजी नगरसेविकेच्या कार्यालयात सापडली पैशांची पाकिटं

ही भेट आणि चर्चा संपली असून मी समाधानी असल्याचे दिसत आहे. उद्याच्या ठाण्याच्या सभेत राज ठाकरे यांनी आपल्याला बोलावलं असल्याचं मोरे यांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान, सर्व प्रश्नांची उत्तरे याच सभेत मिळतील, असं राज ठाकरे यांनी म्हटल्याचं मोरेंनी यावेळी सांगितले. तसेच मी मनसेचा कार्यकर्ता असून इतर कोणत्याही पक्षात जाणार नाही. मी मनसेतच राहणार, सगळ्या ऑफर्स संपल्या. मी माझ्या साहेबांसोबत, आयुष्यात संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजयोग येत नाही, असंही मोरेंनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

गुणरत्न सदावर्ते यांना 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

गिरीश भाऊंनी सरकारमध्ये मला एकटं सोडलं; गुलाबराव पाटलांचा टोला

मनसे-भाजप युती होणार का?; राज ठाकरेंच्या भेटीनंतर रावसाहेब दानवेंनी दिलं उत्तर, म्हणाले…