Home नाशिक “मी आता टेन्शन फ्री, इतरांना टेन्शन देण्याचं काम करणार”

“मी आता टेन्शन फ्री, इतरांना टेन्शन देण्याचं काम करणार”

नाशिक : माझ्या डोक्यावरील टेन्शन कमी झालं आहे. त्यामुळे आता इतरांना टेन्शन देण्याचे काम मी सुरु करणार आहे, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नुकतंच प्रवेश केलेले नेते एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीसांवर अप्रत्यक्ष निशाणा साधलाय.

मागच्या कालखंडात गेले चार वर्षे मी भीतीच्या छायेखाली वावरत होतो. कधी माझ्या मागे ईडी लागेल, कधी अँटी करप्शन लागेल. कधी विनयभंगासारखी केस दाखल केली जाईल, याची नेहमी भीती असायची. मात्र आता मी त्या केसमधून निर्दोष सुटलो आहे. विनयभंगासारख्या खटल्यातूनही बाहेर आलो आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले.

दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कुल्फी आणि चॉकलेट देऊन भाजपात प्रवेश दिला. भाजपातील अनेक आमदार माझ्या संपर्कात आहे. मात्र पक्ष बंदी कायद्यामुळे अनेक जण अडचणी आहेत. मला साधा कार्यकर्ता म्हणून काम करायला मला आवडेल,असंही एकनाथ खडसेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“पंकजा मुंडे भाजप सोडणार नाहीत”

“विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण”

क्विंटन डीकाॅक-ईशान किशनची नाबाद मॅच विनिंग पार्टनरशिप; चेन्नईचा दारूण पराभव

ट्रेंट बोल्टची घातक गोलंदाजी; मुंबईने चेन्नईला 114 धावांत रोखलं