मुंबई : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज मातोश्रीवर मुख्यमंत्री व शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
यावेळी उर्मिला मातोंडकर यांना त्यांच्या सेक्युलर विचारसरणीविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना उर्मिला मातोंडकर यांनी मी जन्माने आणि कर्माने हिंदूच आहे. अगदी लहानपणापासून मी हिंदू धर्माविषयी अभ्यास करत आली आहे. त्यामुळे वेळ आल्यावर मी धर्मानुसारच वागेन, असं वक्तव्य शिवसेना नेत्या उर्मिला माताेंडकर यांनी केलं.
दरम्यान, सेक्युलर असणं म्हणजे इतरांच्या किंवा स्वत:च्या धर्माचा तिरस्कार करणे नव्हे. हिंदू हा सर्वात सहिष्णू धर्म आहे. मी जन्माने आणि कर्माने हिंदू आहे. मी आजवर हिंदू धर्माचा बराच अभ्यास केला आहे. वयाच्या आठव्या वर्षापासून मी योगसाधना केली आहे. त्यामुळे मला हिंदू धर्माविषयी पुरेशी जाण आहे., असंही माताेंडकर म्हणाल्या.
महत्वाच्या घडामोडी-
कदाचित भाजपला माझ्यापासून भीती वाटत असेल- आदित्य ठाकरे
उर्मिला मातोंडकरांच्या प्रवेशाने शिवसेनेच्या महिला आघाडीच्या रणरागिणींचे अवमूल्यन- प्रविण दरेकर
उर्मिला मातोंडकर महाराष्ट्रासाठी चांगलं काम करतील; आदित्य ठाकरेंकडून खास शुभेच्छा
“सत्तेच्या स्वार्थासाठीच महाविकास आघाडीतील तीन पक्ष एकत्र आलेत”