मुंबई : भाजपचे जेष्ठ्य नेते एकनाथ खडसे यांचं राष्ट्रवादी प्रवेशावर शिक्कामोर्तब झाला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. यावर राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथ खडसेंनी भाजपचा राजीनामा दिल्यानंतर मांडलेले मुद्दे ऐकून धक्का बसला. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण इतकं खुनशी असेल याची यापूर्वी कधी कल्पना केली नव्हती, असं अमोल मिटकरी म्हणाले.
आज एकनाथ खडसे साहेबांनी अंतःकरणपूर्वक जे मुद्दे पत्रकार परिषदेत मांडले ते ऐकून धक्का बसला. चार दशकं ज्यांनी पक्ष वाढवला त्या नेत्यांना असा त्रास? केंद्राने गंभीर दखल घ्यावी, असंही अमोल मिटकरींनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांचे राजकारण इतकं खुनशी असेल याची यापूर्वी कधी कल्पना केली नव्हती. आज एकनाथ जी खडसे साहेबांनी अंतःकरण पुर्वक जे मुद्दे पत्रकार परिषदेत मांडले ते ऐकुन धक्का बसला.
चार दशकं ज्यांनी पक्ष वाढवला त्या नेत्यांना असा त्रास? केंद्राने गंभीर दखल घ्यावी.— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) October 21, 2020
महत्वाच्या घडामोडी-
“एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीत किंमत मिळणार नाही, त्यांना पश्चाताप होईल”
एकनाथ खडसेंचं जाणं नक्कीच चांगलं नाही- सुधीर मुनगंटीवार
काही मिळालं, नाही मिळालं याचं दु:ख नाही, मी फक्त फडणवीसांवर नाराज- एकनाथ खडसे
एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले…