पुणे : प्रवीण तरडे यांचा लेखन- दिग्दर्शन असलेला ऐतिहासिक सिनेमा ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित होणार होता. पण कोरोनाच्या संकटामुळे चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. याच पार्श्वभूमीवर या चित्रपटाचं नाव एका शेतकऱ्याने ‘ग्रास आर्ट’च्या स्वरुपात तयार केलं आणि त्याचा व्हिडीओ प्रवीण तरडेंपर्यंत पोहोचला.
अभयसिंह अडसूळ या शेतकरी मित्राच्या संकल्पनेतून कुंडलिक राक्षे या शेतकऱ्याने गव्हाची अशी शेती केली. याला बहुदा ग्रास आर्ट म्हणतात.’ हे लिहित असतानाच तरडेंनी या शेतकऱ्याला शब्द दिला. ‘कुंडलिक मी तुला ओळखत नाही पण माझा शब्द आहे तुला, तुझ्या या गव्हाच्या कापणीला मी स्वत: ईळा घेऊन येणार, असं प्रविण तरडे म्हणाले.
दरम्यान, प्रवीण तरडेंनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर शेतकऱ्याच्या शेतीचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
https://www.facebook.com/pravin.tarde.9/posts/3164864373534816
महत्वाच्या घडामोडी-़
निलेश राणे-रोहित पवार यांच्या वादावरुन जयंत पाटलांचा रोहित पवारांना सल्ला; म्हणाले…
खासदार धैर्यशील माने यांनी दिलं होम क्वारंटाईनसाठी स्वतःचं घर
निलेश राणेंनी रोहित पवारांची काढली लायकी; म्हणाले…
घराच्या अंगणाला ‘रणांगण’ बनवणं याला शहाणपण म्हणत नाहीत; अजित पवार संतापले