Home महाराष्ट्र मला आता चंद्रकांत पाटलांशी बोललंच पाहिजे; जयंत पाटलांचा टोला

मला आता चंद्रकांत पाटलांशी बोललंच पाहिजे; जयंत पाटलांचा टोला

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशातील मुख्यमंत्र्यांशी कोरोनाच्या स्थितीबाबत चर्चा केली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र प्रकृतीच्या कारणास्तव अनुपस्थित होते. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला.

महाराष्ट्र नीट चालला आहे की नाही, हे पाहण्यासाठी विविध जिल्ह्यांमधील दहा हजार लोकांचा प्रामाणिक सर्वे घ्या मग ते सांगतील की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकदाही मंत्रालयात आलेले नाहीत, राज्याचे मुख्यमंत्री मागील जवळपास 70 दिवसांपासून कोणालाही उपलब्ध नाहीत, अशी टीका चंद्रकांत पाटलांनी केली होती. यावरून आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : ‘…तर महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही’; राष्ट्रवादीचा भाजपवर निशाणा

मला आता चंद्रकांत पाटलांशीच बोललं पाहिजे की, का ते रोज असं बोलत आहेत. कारण मुख्यमंत्री कार्यरत झाले आहेत. त्यांनी काम सुरू केलं आहे. ते झूमवरून आमच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीलाही उपस्थित होते. त्यामुळे त्यांचं काम कुठे अडलंय असं मला वाटत नाही. ते व्यवस्थित काम करत आहेत, असं जयंत पाटलांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी – 

…तर मी आमदारकीचा राजीनामा देऊन टाकेन; शिवसेना आमदाराचं मोठं वक्तव्य

“देवेंद्र फडणवीस हे आमचे कुटुंब प्रमुख, आमचे दैवत, त्यांच्यावर नाराज होऊ शकत नाही”

माझी दृष्टी तपासून घ्यायला, माझं नेतृत्व समर्थ आहे, त्यांनी माझी काही काळजी करू नये; चंद्रकांत पाटलांचा पलटवार