“तासाभारापूर्वीच संजय राऊत भेटले, त्यानंतर आता शरद पवार गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांच्या भेटीला; चर्चांना उधाण”

0
708

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : काही तासापूर्वीच शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याशी तासभर चर्चा केल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत.

हे ही वाचा : “भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल”

विशेष म्हणजे शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील यांच्या भेटीवेळी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे हे देखील हजर असणार आहे. शरद पवार यांनी या भेटीसाठी पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनाही निमंत्रण दिलं आहे.

दरम्यान, या भेटीत मुंबईतील ड्रग्ज प्रकरण, हायव्होल्टेज आर्यन खान ड्रग्ज केस, अनिल देशमुख अटक प्रकरण या विषयांवर चर्चा होणार असल्याची माहिती कळतीये. त्यामुळे राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

संजय राऊत शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर; भेटीचं कारण काय? चर्चांना उधाण

आता मी ढवळाढवळ करू का?; उदयनराजेंचा थेट राष्ट्रवादीसह विरोधकांना इशारा

भाजपचा काँग्रेसला धक्का; माजी मुख्यमंत्र्यांच्या पुत्रासह दोन आमदारांचा भाजपमध्ये प्रेवश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here