मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील जनतेशी संवाद साधत गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. तसंच आजच्या दिवशी आपण संकल्प करूया घरात राहून कोरोनाला पळवून लावूया, असं आवाहन त्यांनी राज्यातील जनतेला केलं. यावेळी मी आमच्या मिसेस मुख्यमंत्र्यांचं ऐकतो. तुम्हीही घरात बसा अन् तुमच्या गृहमंत्र्यांचं ऐका, असं मिश्किलपणे म्हणत मुख्यमंत्र्यांनी जनतेला घरी राहण्याचं आवाहन केलं.
सर्वांना आता करोना व्हायरस आणि त्याच्या गांभीर्याची पूर्ण कल्पना आली आहे. या संकटाकडे आपण आतापर्यंत नकारात्मक पद्धतीने बघत आलो आहोत. ते तसंच आहे खरं तर. कारण घराबाहेर पडू नका ही माझी सर्वांसाठी सूचना आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे
दरम्यान, मी पाहतोय की अनेक महिन्यांनी किंवा वर्षांनी कुटुंब एकत्र आली आहेत. आई-वडील, आजी-आजोबा, मुलं, नातवंड हे सर्वचं एकत्र आले आहेत. कोणी वाचन करतय, कोणी संगीत ऐकतयं, कोणी कॅरम खेळतयं. तर आपण जे गमावलं होतं ते यानिमित्ताने आपण आपली हैस भागवून घेत आहोत. काही वाईट नाही चांगली गोष्ट आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी
शेतकऱ्यांची अडचण लक्षात घ्या; रोहित पवारांची राज्य सरकारवा विनंती
कोणीही गोंधळू नका, घाबरु नका; देशात लॉकडाऊन पण ‘या’ सेवा कधीच बंद होणार नाहीत- मुख्यमंत्री
लॉक डाऊन करण्याचा निर्णय योग्यच.. पण गरिबांनी कसं जगायचं? रुपाली चाकणकरांचा पंतप्रधांना सवाल
“आपल्या घरासमोर आपणच लक्ष्मण रेखा ओढू आणि ती पार न करण्याची शपत घेऊ”