मोदींचा पत्रकार परिषद न घेण्याचा गुण मला अधिक आवडतो- प्रीतम मुंडे

0
309

आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बीड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 7 वर्षात एकदाही पत्रकार परिषद घेतली नाही. त्यामुळे त्यांच्यावर मोदींवर सर्व बाजूंनी टीका होत आहे. यावरून भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

मोदींचा पत्रकार परिषद न घेण्याचा गुणच आपल्याला आवडत असल्याचं प्रीतम मुंडे यांनी म्हटलं आहे. प्रीतम मुंडे यांच्या या वक्तव्यानंतर सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

मोदींचा मला सर्वात जास्त आवडणारा गुण म्हणजे त्यांनी गेल्या 7 वर्षात एकदाही पत्रकार परिषद घेतली नाही. त्यांनी पत्रकार परिषद घेतली नाही म्हणून त्यांच्यावर टीका झाली. पण ते आपलं काम करत आहेत. आपल्या मार्गावर मार्गक्रमण करत आहेत, असं मुंडे म्हणाल्या.

महत्वाच्या घडामोडी –

किरीट सोमय्या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…

“आधी पोलिसांशी बाचाबाची, तरीही किरीट सोमय्या निघाले कोल्हापूरला जाण्यासाठी”

कोंबडं कितीही झाकलं तरी…; किरीट सोमय्यांना आलेल्या नोटीसवरून प्रवीण दरेकर आक्रमक

सरकारच्या दडपशाहीला भाजपा घाबरत नाही; सोमय्या यांच्या नोटीसवरून चंद्रकांत पाटलांची टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here