मावळ : आर्यन खान अटक प्रकरणावरून राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी आणि भाजपवर दररोज आरोप करताना दिसत आहेत. याला आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय.
नवाब मलिक सारख्यांना मी माझ्या खिशात ठेवतो, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुणे जिल्ह्यातील तळेगांवमध्ये केसर या हॉटेलचं उद्घाटन झालं. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला.
हे ही वाचा : ‘हे’ सरकार गेंड्याच्या कातडीचे संवेदनाहीन; प्रविण दरेकरांची टीका
‘वानखेडे हा माझा जावई नाही आणि भाजपाचा कार्यकर्तादेखील नाही. वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यात जे सुरू आहे ते सुरू राहावे. परंतु, सर्वसामान्य माणूस हा वानखेडे यांच्या मागे खंभीरपणे उभा आहे. त्याची मलिकांनी जास्त चाचपणी करु नये. कारण समाज हा नेहमी ज्याच्यावर अन्याय होतो त्याच्या पाठीशी उभा असतो आणि अन्यायाच्या विरोधात लढणाऱ्यावर अन्याय होतो तेंव्हा समाज हा पाठीशी राहतोच हे नवाब मलिकांनी लक्षात ठेवावे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
राष्ट्रवादीनं प्रवेश केलेल्या ‘त्या’ 22 नगरसेवकांची यादी जाहीर करा; भाजपचं आव्हान
“शेतकऱ्यांना अल्प मदत; ठाकरे सरकारच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्ते करणार आंदोलन”
निलेश राणे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात; नारायण राणेंनी प्रचारासाठी कसली कंबर