“मी पूजाला फक्त उचलून रिक्षात ठेवलं; मोबाईल, लॅपटॉपशी माझा काही संबंध नाही”

0
320

पुणे : भाजप नगरसेवक धनराज घोगरे यांच्यावर पूजा चव्हाणचा लॅपटॉप चोरल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर धनराज घोगरे गायब असल्याची चर्चा होती. याच पार्श्वभूमीवर धनराज घोगरे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले.

पूजा चव्हाण इमारतीवरुन खाली पडली होती तेव्हा मी फक्त उचलून तिला रिक्षात ठेवलं. तिच्या मोबाईल आणि लॅपटॉपशी माझा काहीही संबंध नाही, असं स्पष्टीकरण धनराज घोगरे यांनी दिलं.

दरम्यान, पूजा चव्हाण इमारतीवरून खाली पडली तेव्हा मी त्याठिकाणी केवळ माणुसकीच्या नात्याने गेलो होतो. मी तिला उचलून रिक्षात ठेवले. त्यावेळी अरूण राठोड आणि विलास चव्हाण हे दोघेही त्याठिकाणी हजर होते. पूजाला उपचार मिळणे, ही माझी प्राथमिकता होती. मी पूजाच्या फ्लॅटमध्ये जाऊन तिच्या कोणत्याही वस्तूला हात लावलेला नाही, असं धनराज घोगरे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

शिवसेनेनं बंगालच्या निवडणुकीत उतरावं त्यांना त्यांची औकात कळेल- राम कदम

“उद्धवजी हे महाराष्ट्राचे राहुल गांधी झाले आहेत”

“वाटेल तितकं आपटा तुम्ही, वाटेल तितकं बोंबला, तुम्हाला उत्तर देणार नाही”

“पूजा चव्हाणचा लॅपटाॅप चोरल्याचा आरोप; भाजपचा ‘तो’ नगरसेवक गायब”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here