मुंबई : मी शिवसेना सोडेन असं मला कधीच वाटलं नव्हतं. आजदेखील कोणत्याही ठाकरेंबद्दल माझ्या मनात आकस नाही, असं मत भाजपा नेते नारायण राणे व्यक्त केलं आहे. ते ‘लोकसत्ता’ या वृत्तसंस्थेच्या कार्यक्रमात बोलत होते.
नारायण राणेंना घडवण्याचं श्रेय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचं आहे. मी शिवसेनेत असताना माझं कर्तव्य पूर्ण केलं. आजदेखील कोणत्याही ठाकरेंबद्दल माझ्या मनात आकस नाही, असं नारायण राणे म्हणाले.
दरम्यान, कोणीही जर टीका केली तर त्या टीकेला मी नक्कीच उत्तर देतो. पण कोणाविषयीही मनात कटुता नाही, असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
नक्की नियंत्रणात काय, कोरोनाची स्थिती का आमदारकी? भाजपचा मुख्यमंत्र्यांना टोला
…म्हणून मी शिवसेनेचा राजीनामा दिला होता- नारायण राणे
शाहू राजांचा फडणवीसांनी कार्यकर्ता म्हणून उल्लेख केला, यावरुन सचिन सावंतांची टिका; म्हणाले…
17 मेनंतर सरकारची रणनीती काय?; सोनिया गांधींचा केंद्र सरकारला सवाल