कर्नाटक: कर्नाटकातील सत्तारूढ आघाडीतील 16 आमदारांनी राजीनामे दिल्याने काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे 11 महिन्यांचं आघाडी सरकार कोसळलं होतं. मात्र हे सरकार पाडण्यापूर्वी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी पैसे देऊ केले होते, असा खुलासा भाजपचे आमदार श्रीमंत बाळासाहेब पाटील यांनी केला .
मी भाजपची पैशांची ऑफर न घेता पक्षात आलोय. मला पैसे नकोय, तर मला केवळ मंत्रीपद पाहिजे होतं. मात्र, मागणी करूनही मला मंत्रीपद देण्यात आलं नाही, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली .
जनतेची सेवा करण्यासाठी मला मंत्रिपद हवं होते. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी मला पैसे देऊ केले गेले होते. त्यावेळी मला पाहिजे तेवढे पैसे मागता आले असते. मात्र, मी पैशांची मागणी केली नाही. सध्याच्या सत्ताधारी सरकारमध्ये मंत्रीपद का दिले गेले नाही. याबाबत मला अद्यापही माहिती नाही. पण पुढील मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रीपद देण्यात येईल, असं आश्वासन देण्यात आलं आहे, असं बाळासाहेब पाटील म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
“सांगलीत उद्या कृष्णा नदीची पाणी पातळी 25 ते 27 फुटांपर्यंत जाण्याची शक्यता”
“साताऱ्यात शशिकांत शिंदेंचा शिवेंद्रराजे भोसलेंना मोठा धक्का; अनेक समर्थकांचा राष्ट्रवादीत प्रवेश”
उत्तरप्रदेश निवडणूकीत ‘आप’ सर्व जागा लढवणार