आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
अमरावती : राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी भीम आर्मीने शाईफेक केली होती. याप्रकरणावर राज्याचे मंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं आहे.
मी कुठल्याही परिस्थितीला तोंड द्यायला तयार असतो. माझ्या बॅगेत आठ शर्ट असतात. एकावर शाई फेकली की दुसरा शर्ट घालतो, तिसऱ्या मिनिटाला कामाला लागतो, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
ही बातमी पण वाचा : दिवाळीत पवार कूटूंब एकत्र येणार का?; सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर, म्हणाल्या…
आत्तापर्यंत माझ्यावर दोनदा शाई फेकण्यात आली. पण मी लगेच कामाला लागलो असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. चंद्रकांत पाटील हे आज अमरावती दौऱ्यावर होते. यावेळी ते बोलत होते.
दर आठवड्याला अमरावतीत यावं असा माझा संकल्प आहे. मेळघाटात मोठा निधी जातो पण अमलबजावणी होत नाही हे माझ्या निदर्शनास आलं आहे त्यामुळे मी मेळघाटात जाणार आहे, असंही चंत्रकांत पाटील यावेळी म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या घडामोडी –
“मनसेचा मोठा राजकीय डाव, निवडणूकीआधी बारामतीत मोठ्या हालचाली”
‘उद्धव ठाकरे यांना अटक करा’- नितेश राणे