आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 व अपक्ष 10 आमदारांना सोबत घेऊन बंड केलं. शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे शिवसेनेत गळती सूरू झाली आहे.
अशातच 12 राज्यातील शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी मंगळवारी मुंबईत बैठक घेत शिंदे गटाला पाठिंबा दिल्याची बातम्या काल प्रसारमाध्यमांमध्ये झळकत होत्या. या 12 नेत्यांमध्ये गोव्याचे शिवसेनाप्रमुख जितेश कामत यांच्याही नावाचा समावेश होता. यावर आता कामत यांनी स्वत: स्पष्टीकरण दिलं आहे.
हे ही वाचा : “राष्ट्रवादीचा ‘हा’ मोठा नेता करणार शिंदे गटात प्रवेश?”
मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो नाही. त्यांना आमच्या राज्यातून कोण भेटले मला माहिती नाही. माझं नाव त्यात घेऊ नये, कारण त्या व्हायरल फोटोत तर मी कुठे दिसतही नाही, कारण मी तिथे नव्हतोच. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझी गोवा राज्यप्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे मी शिवसेनेतच आहे. मी शिवसेना सोडलेली नाही. मी कायम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबतच आहे, असं स्पष्टीकरण कामत यांनी यावेळी दिलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
“आत्ता छावा मैदानात, दसऱ्यानंतर आता वाघही थेट मैदानात उतरणार”
आंबेडकर चळवळीतील ‘या’ ज्येष्ठ नेत्याची उद्धव ठाकरेंना साथ; शिवसेनेत केला प्रवेश
वेदांता प्रकरणावरून गिरीश महाजनांचा महाविकास आघाडीला टोला, म्हणाले, त्यांना वाईनसाठी…