Home महाराष्ट्र कोणीही गोंधळू नका, घाबरु नका; देशात लॉकडाऊन पण ‘या’ सेवा कधीच बंद...

कोणीही गोंधळू नका, घाबरु नका; देशात लॉकडाऊन पण ‘या’ सेवा कधीच बंद होणार नाहीत- मुख्यमंत्री

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशामध्ये 21दिवस लॉकडाउन करण्याची घोषणा केली. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांशी संवाद साधला. यासंदर्भातील माहिती उद्धव ठाकरेंनी ट्विटरवरुन लाइव्ह व्हिडिओच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना दिली.

माझं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलणं झालं. महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले जे नियम आहेत ते तसच राहतील. जीवनावश्यक सोयी व सुविधा सुरूच राहतील. कोणीही गोंधळू नये, घाबरु नये आणि रस्त्यावर, दुकानात बाजारपेठेत गर्दी करू नये, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

  • अन्नधान्य, दुध आणि भाजीपाल्याची दुकाने सुरू राहणार
  • दवाखाने सुरू राहणार
  • औषधे बनवणाऱ्या कंपन्या
  • मेडिकल
  • फायर ब्रिगेड
  • महापालिका

दरम्यान, हे संकट गंभीर आहे. कृपया घराबाहेर पडू नये, महाराष्ट्र सरकार तुमच्या सोबत आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी

लॉक डाऊन करण्याचा निर्णय योग्यच.. पण गरिबांनी कसं जगायचं? रुपाली चाकणकरांचा पंतप्रधांना सवाल

“आपल्या घरासमोर आपणच लक्ष्मण रेखा ओढू आणि ती पार न करण्याची शपत घेऊ”

“लॉकडाऊनला सकारात्मक पाठिंबा देऊन आपण कोरोनावर मात करूया”

भाइयों और बहनो..” बोलून काही फरक पडणार नाही- रुपाली चाकणकर