“देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्रावर इतका राग का आहे, हेच समजत नाही”

0
148

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्रावर इतका राग का आहे, हेच समजत नाही. यासंदर्भातील राजकारणात मी जाऊ इच्छित नाही. परंतु त्यांचे आरोप हे संपूर्ण महाराष्ट्राची बदनामी करणारे आहेत. महाराष्ट्र पोलीस दलाचे संपूर्ण जगात नाव आहे. यामागे आम्हा कोणा राजकारण्याचे नव्हे तर पोलीसांचेच कर्तृत्व आहे, असं म्हणत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

महाराष्ट्र पोलीस दलाला उज्वल परंपरा आहे. स्वत: फडणवीस यांनी गृहमंत्री या नात्याने पोलीस दलाचे नेतृत्व केले आहे. पाच वर्षे याच पोलिसांनी त्यांना प्रशासन चालविण्यात, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात साथ दिली. त्यांचेच ‘थोबाड काळे झाले’ या प्रकारची भाषा हे वापरू कशी शकतात?, असा संतप्त सवालही अनिल देशमुख यांनी यावेळी केला आहे.

दरम्यान, आपल्या समाजाचे म्हणून काही आदर्श आहेत. सामान्य माणसाचा कायदा व सुव्यवस्थेवरचा विश्वास त्यामुळे टिकून आहे. क्षुद्र राजकारणासाठी आपण या पध्दतीचे आरोप करून सामान्य जनतेचा हा विश्वास डळमळीत करू नका असे मी फडणवीसांना आवाहन करतो, असंही अनिल देशमुख म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

पुण्याच्या ‘त्या’ आजींचा दिल्लीत सत्कार; आजीबाईंचा काठीचा खेळ पाहून केजरीवालही झाले अवाक, पाहा व्हिडिओ

“मोठी बातमी! जळगावमध्ये 3 दिवसांचा जनता कर्फ्यू”

…तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अनेकजण अडचणीत येतील; शिवेसेनेच्या ‘या’ नेत्याचं मोठं वक्तव्य

“अध्यक्ष महोदय मी दुखावलो गेलोय, राहुल गांधी यांना शाळेत पाठवण्यात यावं”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here