Home महाराष्ट्र अण्णा हजारे या आंदोलनात सहभागी होतील असं वाटत नाही- नितीन गडकरी

अण्णा हजारे या आंदोलनात सहभागी होतील असं वाटत नाही- नितीन गडकरी

नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज 20 वा दिवस आहे. मात्र, अद्यापही कृषी कायद्याबाबत तोडगा निघू शकला नाही. विरोधकांकडून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवण्यात येतोय. यावर केंद्रिय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नितीन गडकरी यांनी एएनआय ला मुलाखत दिली. त्यात ते बोलत होते.

केंद्र सरकार हे शेतकऱ्यांसाठी समर्पित सरकार आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या सूचना आणि सल्ल्यांवर विचार करण्यास तयार आहोत. आमच्या सरकारकडून शेतकऱ्यांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. शेतकऱ्यांनी पुढे येऊन कृषी कायदे समजून घ्यायला हवे, असं गडकरी यांनी म्हटलं.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे या आंदोलनात सहभागी होतील असं आपल्याला वाटत नाही. कारण, सरकार शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने काम करत आहे. सरकारने शेतकरी विरोधात काही केलं नाही. जर संवादच झाला नाही तर गैरसमज होण्याची दाट शक्यता आहे. पण संवाद झाला तर शेतकऱ्यांना न्याय मिळून हे प्रकरण सुटेल, असा विश्वासही यावेळी गडकरींनी व्यक्त केला.

महत्वाच्या घडामोडी-

“महिला व बालकांवर अत्याचार केल्यास फाशीच्या शिक्षेची तरतूद”

“महाराष्ट्रात आणीबाणी आहे की नाही हे जनता ठरवेल”

…यामुळे मी राजकारणात येण्याच्या योग्यतेची नाही- अमृता फडणवीस

“मराठा आंदोलक आक्रमक, मुंबईतील सीएसटी परिसरात ठिय्या आंदोलन”