मुंबई : 100 कोटी रुपये वसुलीचे आरोप झाल्यानंतर अनिल देशमुख यांना आपल्या गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. तर आता परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्या लेटर बॉम्बमुळे अनेक आरोप होत आहेत. यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी सचिन वाझे आणि अनिल परब यांचे संवाद एनआयएकडे आहेत, असा दावा केला. आता यावर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अनिल परब हे पूर्णपणे निर्दोष आहेत. त्यांनी भुमिका स्पष्ट केली आहे. भूमिका स्पष्ट करताना त्यांच्यात आत्मविश्वास दिसत होता. त्यामुळे त्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. एनआयए किंवा सीबीआय काय करणार आहे ?, हे भाजपचे लोकं अगोदरच बोलून मोकळे होतात. या यंत्रणांचा वापर भाजप कसं करतेय, हे देशातल्या लोकांना कळून चुकलंय. अनिल परब हे एनआयएला संपूर्ण सहकार्य करतील, असं विनायक राऊत म्हणाले.
दरम्यान, सचिन वाझे आणि अनिल परब यांच्यातील संवाद एनआयएकडे आहेत, या नितेश राणे यांच्या दाव्याबद्दल बोलताना, ज्यांचं तोंड फाटलेलं आहे त्यांना मला उत्तर देण्याची गरज नाही, असं जोरदार प्रत्युत्तर राऊत यांनी राणेंना यावेळी दिलं.
महत्वाच्या घडामोडी –
मुख्यमंत्री ‘मातोश्री’मधून बाहेर पडत नाही, ते कोरोना रुग्णांना कसं सांभाळणार?; नारायण राणेंचा सवाल
मोठी बातमी! 11 एप्रिल रोजी होणारी MPSC ची परीक्षा पुढे ढकलली!
महाराष्ट्रात 3 आठवड्यांचा कडक लॉकडाऊन होऊ शकतो; विजय वडेट्टीवारांनी दिले संकेत
MPSC ची परीक्षा पुढे ढकला; राज ठाकरेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन