Home महाराष्ट्र महाराष्ट्रात 3 आठवड्यांचा कडक लॉकडाऊन होऊ शकतो; विजय वडेट्टीवारांनी दिले संकेत

महाराष्ट्रात 3 आठवड्यांचा कडक लॉकडाऊन होऊ शकतो; विजय वडेट्टीवारांनी दिले संकेत

मुंबई : राज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेल्याने राज्यात 3 आठवड्यांचा कडक लॉकडाऊन होऊ शकतो, असे संकेत काँग्रेस नेते तसेच मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र, कोणत्याच उपायाला यश येताना दिसत नाही. परिणामी लोकांचे जीव वाचवण्यासाठी काही दिवसांचा कडक लॉकडाऊन गरजेचा असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.

दरम्यान, यातच केंद्र सरकार महाराष्ट्राला सापत्न वागणूक देत आहे. लशींचा तुटवडा निर्माण होऊनही महाराष्ट्राला पुरवठा केला जात नाही. याउलट गुजरातला जास्त लसी देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी 3 आठवड्यांचा लॉकडाऊन अपरिहार्य आहे. तसेच यासंदर्भात मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आजच विनंती करणार असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

MPSC ची परीक्षा पुढे ढकला; राज ठाकरेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन

क्या आपका खून ऐसे राजा को देख खौलता नही?; अमृता फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांवर ट्विट

किमान संकट काळात तरी राजकारण करू नका; रोहित पवारांनी भाजप नेत्यांना सुनावलं

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले…