Home महाराष्ट्र राज्यपालांनी हिंदुत्वाचा मुद्दा का निर्माण करावा हे कळत नाही- जितेंद्र आव्हाड

राज्यपालांनी हिंदुत्वाचा मुद्दा का निर्माण करावा हे कळत नाही- जितेंद्र आव्हाड

मुंबई : हिंदुत्वाचे आपण खंदे पुरस्कर्ते आहात. धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय पुढे ढकलण्यासाठी आपल्या कोणतीही दैवी सूचना मिळत आहे की तुम्ही ज्या शब्दाचा तिरस्कार करत होतात, ती ‘धर्मनिरपेक्षता’ तुम्ही अंगिकारली?, असं पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहलं होतं. यावर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कुठल्याही धर्माची प्रार्थनास्थळं उघडायला सरकारने अनुमती दिलेली नाही. मा. राज्यपालांनी यात हिंदुत्वाचा मुद्दा का निर्माण करावा हे कळत नाही, असं ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

नवरात्रीच्या पहिल्या माळेला खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित; ‘या’ माजी आमदाराचा दावा

राज्यपालांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनाही असंच पत्रं लिहिलंय का?- बाळासाहेब थोरात

एक कोटी रुपये द्या, अन्यथा बॉम्बने उडवून देऊ; भाजप नेते गिरीश महाजन यांना धमकी

“…आधी आपल्या घरातील गोष्टी निस्तरा”; नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका