आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला उद्देशून मंचावर उपस्थित सर्व आजी-माजी आणि भावी सहकारी’ असा उल्लेख केल्यानंतर महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीच्या चर्चा रंगू लागल्या होत्या.
मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे नाराज असल्याची चर्चा आहे. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा दावाही संजय राऊतांनी यावेळी केला. यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संजय राऊतांवर टीका केली.
‘संजय राऊत काय ‘घेऊन’ बोलतात माहिती नाही. पाणी पितात की अजून काही… , असा टोला राणेंनी यावेळी लगावला. तसेच नंतर संजय राऊतांबाबत विचारलेल्या प्रश्नावर, ‘संजय राऊत माझा बॉस आहे का? मी त्याच्या प्रश्नाला का उत्तर देऊ’ असं राणेंनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
“मोठी बातमी! पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा राजीनामा”
“शिवसेना भवन फोडण्याची भाषा करणाऱ्यांशी युती कशी करणार?”
“शिवसेना-राष्ट्रवादीची मोठी रणनिती; भाजपला खिंडार पाडणार?”
“जयंत पाटील-देवेंद्र फडणवीस एकाच गाडीत; राजकीय चर्चांना उधाण”