रुपाली चाकणकरांना मी ओळखत नाही; चाकणकरांच्या बंटी-बबलीच्या टीकेला नवनीत राणांचं प्रत्युत्तर

0
466

मुंबई : राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी ट्विट करत भाजप नेते रवी राणा व त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांना टोला लगावला होता. बायको जात चोरते आणि नवरा राजदंड , हे तर बंटी-बबली निघाले, असं रूपाली चाकणकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. यावर नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मी रुपाली चाकणकर यांना ओळखत नाही. मी शरद पवार, अजित पवार यांना ओळखते. त्यांनी काही म्हटल्यास त्याला उत्तर देईन. या दोन्ही नेत्यांचा मी आदर करते. त्यांनी काही म्हटलं आणि माझं चुकत असेल तर ती चूक सुधारण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ज्यांना मी ओळखतच नाही त्यांच्याबद्दल मी काही बोलू शकत नाही, असं प्रत्युत्तर नवनीत राणा यांनी रुपाली चाकणकर यांना यावेळी दिलं. त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

महत्वाच्या घडामोडी –

“नारायण राणेंना जे पद मिळालं, त्यापेक्षा त्यांची उंची मोठी, तरीही आमच्या शुभेच्छा”

“सत्य हेच आहे की, हे सरकार फक्त दीड माणसं चालवताहेत, एक मोदी आणि अर्धे अमित शाह”

“बायको जात चोरते आणि नवरा राजदंड, हे तर बंटी-बबली निघाले”

“उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाच्या सुविधांचा उपभोग घ्यायचा आहे, पण जबाबदारीपासून पळ काढायचा आहे”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here